Monday, February 23, 2009

जय हो....!!!

फाईनली ऑस्कर गोज टू बेस्ट फिल्म स्लमडॉग मिलेनिअर....असं म्हणताच एकच जल्लोष
एक नाही दोन नाही तर चक्क आठ ऑस्कर पुरस्कारांवर स्लमडॉग मिलेनिअरने नावं कोरलं आणि एक नवा इतिहासच रचलाय.....'जय हो 'या गाण्याच्या बोलप्रमाणेच स्लमने खरोखरच जय प्राप्त केला आणि, सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का दिला...ए.आर.रहेमान,गुलजार,पुकुल्ली या तीन भारतीयांनी आपल्या देशाचं नावं आज ख-या अर्थाने रोशन केलयं...यात विशेष म्हणजे काही मराठी व्यक्तींचाही तितकाच मोलाचा वाटा आहे...त्यापैकी अभिषेक रेडकर आणि राहुल खंडारे यांनी तर मराठीची पताका सातासमुद्रापार पोहचवली. तसंच BEST SHORT DOCUMENTRY साठी SMILE PINKY ला ऑस्कर मिळाला. वेगळ्या कथेवर आधारित असलेली ही DOCUMENTRY खरोखरच मनाला भावते. या DOCUMENTRY चे पण एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे याची निर्मातीही एक मराठीच आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाणारी धारावी झोपडपट्टी ख-या अर्थाने ग्लोबल झाली.
प्रिटोरियात भारतीय राजदूत म्हणून कार्यरत असणारे विकास स्वरूप यांच्या २००५ साली आलेल्या
'Q AND A' या पुस्तकावर आधारित हा चित्रपट तयार करण्यात आलायं...त्यामुळे त्या लेखकाचा गौरवही तितकाच महत्वाचा आहे. दररोज नजरेस पडूनही दुर्लक्षिलं जाणारं जग विकास स्वरूप यांनी यात उलगडून दाखवलंय. तसंच, या चित्रपटामुळे ख-या अर्थाने तंत्रज्ञानांना न्याय मिळाला ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. ए.आर. रहेमान यांच्या जय हो या गाण्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या गाण्यातील म्युझिक एका ब्रिटीश फॅशन डिझायनरने आपल्या कलेक्शनच्या वेळी रॅम्पसाठी वापरलं आणि ते सर्वांच्याच पसंतीस उतरलं...पहिल्यांदा ग्लोडन ग्लोब नंतर बाफ्टा आणि मानाच्या समजल्या जाणा-या ऑस्करवर स्लमडॉगचं नावं कोरलं गेलं.... दरवर्षी अमेरिकेतील चित्रपटांच्या तिप्पट, ब्रिटिश चित्रपटांच्या चौपट चित्रपट देणारा आपला बॉलीवूड सिनेमा अद्याप हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेही ऑस्कर का मिळवू शकला नाही, याची उत्तरं आता तरी आपल्या दिग्दर्शकांना ‘स्लमडॉग’मुळे उमजली तर ऑस्करची ''बाहुली" भारतात आगामी काळात आपल्या देशात येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही.